24
प्रतिक्रिया
नमस्कार मंडळी. शब्दगाऽऽरवा आणि हास्यगाऽऽरवा नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत..... पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा !
आम्ही ह्याला ’पावसाळी विशेषांक का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच...तसंच ह्यात सगळं पावसाळ्यासंबंधीचंच वाचायला मिळेल अशीही अपेक्षा असेल...थोडेफार ते बरोबरही आहे. त्या अनुषंगाने काही लेखन पावसाशी संबंधित असेलच, पण आम्ही खरं तर ह्या अंकासाठी विषयाचं असं बंधन ठेवलेलं नसल्यामुळे इतरही विषयांवरचे लेखन आपण इथे वाचू शकाल.. आता तुम्ही म्हणाल की मग पावसाळी विशेषांक असं आम्ही का म्हणतोय?तर, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे....पावसाळ्यात काढतोय म्हणून पावसाळी विशेषांक. :)
ह्या अंकात आपल्याला विविध साहित्य प्रकार वाचायला मिळणार आहेत...ललित लेखन,कथा,कविता,पाककृती,प्रवासवर्णन इत्यादि. ह्या अंकात...