अ
हमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. गुजराथी लोकं तसेही खूपच खाऊ टाइपचे. त्यामूळे गुजराथमधे गेलं की व्हेज खाण्याची चंगळ असतेच. अहमदाबादला गेलो की नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं खींचू आणि दोन तिन खाकर्याची दुकानं, त्यामधले एक म्हणजे ’इंदूबेननू खाकरा’. हे दुकान इथे गेली पन्नास वर्षापासून आहे असे लोकं सांगतात. मी स्वतःच तर गेली वीस पेक्षा जास्त वर्ष झालीत पण ह्या दुकानातून खाकरा आणल्याशिवाय परत मुंबईला कधीच जात नाही. इंदूबेननू खाकरा, डबल डायमंडनूं सिंग हे मस्ट आहे अहमदाबादला.


सहज भिंतीकडे नजर गेली तर तिथे एक अवॉर्ड लावलेलं दिसलं. अरे? हे काय? मागल्या वेळेस तर नव्हतं असं काही. ते अवार्ड होतं टाइम फुड अवार्ड! दुकानदाराला विचारलं कधी मिळालं हे? तर म्हणाला, की नुकतंच म्हणजे पंधरावीस दिवसापुर्वीच मिळालंय हे अवार्ड! अहमदाबादी लोकं म्हणजे ’चवाण ’प्रीय, आणि त्यामूळे २०१० चं बेस्ट फरसाण अवॉर्ड जे या दुकानाला मिळालेले आहे त्या दुकानात फरसाण नक्कीच चांगलंच मिळत असणार. .
त्या काउंटरवच्या माणसाशी गप्पा मारायच्या होत्या, पण त्याला गर्दी मधे फक्त हिशेब करणे आणि माल देणे या शिवाय काही करायला वेळच नव्हता. तरी पण थोड्या गप्पा मारल्या, तर म्हणे की खुप वर्षापुर्वी एक घरगुती व्यवसाय म्हणून इंदूबेन यांनी सुरु केलेला हा व्यवसाय सचोटी, आणि स्वच्छता या जोरावर इतका मोठा झालाय. आज त्यांची मुलं हाच व्यवसाय सांभाळताहेत. म्हणाला, जूनीच रेसिपी, आणि स्वच्छता ह्या गोष्टी अजुनही पालन केल्या जातात ( अर्थात, टाइम्स ने अवॉर्ड दिलं, तेंव्हा ते ओघा ओघाने आलेच) .आणि म्हणूनच कुठलाही अहमदाबादी माणूस बाहेर जातांना इथे आल्याशिवाय जात नाही. इथुन अमेरिकेत पण खाकरा पाठवतो म्हणाला तो दुकानदार.
जुन्या दुकाना शेजारी एक नवीनच दुकान पण आता सुरु केलंय.खाकर्या व्यतिरिक्त इथे अजून बरंच काही फरसाण वगैरे पण मिळतं, ते मात्र कधीच घेउन पाहिलेले नाही. एक दिड किलो खाकरा मात्र आवर्जुन नेतो मुंबईला परत जातांना. वाजवी दर, आणि उत्कृष्ट क्वॉलीटी यांची खात्री म्हणजे हे दुकान. अहमदाबादला गेलात तर अवश्य भेट द्या..
लेखक: महेंद्र कुलकर्णी
यावरच्या 19 प्रतिक्रिया
वाह लज्जतदार :)
पाणीपुरीची चववाला खाकरा ? अरेच्या ! पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. तो खाल्ला, तर वजन आटोक्यात राहिल ना , मग हाणायला हरकत नाही.
सचोटीने व्यवहार केला तर फळ मिळतंच. तुमच्याकडून ब-याच ठिकाणच्या खाद्यपदार्थांची माहिती मिळते. पाणीपुरीची चव असलेला खाकरा... ऐकून तर मस्त वाटतंय. कधी अहमदाबदला गेले तर खाऊन पाहिन.
काही खाकरे...विशेषत: पाणीपुरी,पालक,कांदा..हे इतर नेहमीच्या प्रकारांबरोबर आमच्या मालाडच्या एका दुकानात मिळतात..खाऊन पाहिलेत...अगदी खुसखुशीत असतात. माझा विशेष आवडता म्हणजे कांदा खाकरा..हा खातांना तर कांदाभजी खाल्ल्याचा आनंद मिळतो.
देवा, कुठे मिळतात सांगा की मग मी पण खाईन खाकरा कांदे भजी :)
देवा, कुठे मिळतात सांगा की मग मी पण खाईन खाकरा कांदे भजी :)
अरे वा! पाणीपुरीच्या चवीचा खाकरा... सहीच आहे की. एकदा चाखायला हवा. :)
आम्ही सारे खवैय्ये, व्वा खाकर्याच्या नुसत्या वाचनाने जिभ चाळवली कगेच बाकरवडी खाउन आनंद मानला.
पाणीपुरी च्या चवीचा खाकरा....पहिल्यांदाच ऐकते आहे. कांदा खाकरा.......कांदा भजी......खाल्लच पाहीजे एकदा.
वाह काय आठवण करून दिलीत.. चला विकांताला खादाडीत खाकरासुद्धा सामील करेन म्हणतो..
पाणीपुरी खाखरा झिंदाबाद. पण अहमदाबादल्या त्या मानानें हॉटेलें कमीच.
मजा आली.
सुधीर कांदळकर
खाकरा आणि थेपला हे दोन्ही पदार्थ मला फार आवडतात... :)
तुम्ही अहमदाबादमधल्या खादाडीच्या ठिकाणांची इतकी नावं सांगितली आहेत ना आत्तापर्यंत की जेव्हा केव्हा अहमदाबादला जाणं होईल तेव्हा फिरण्यापेक्षा जास्त खाणंच होणार आहे तिथे :)
पाणी प्युरे खाकरा...प्रथमच ऐकतोय....ट्राय केला पाहिजे!!
मीही कधी ऎकला नव्हता पाणीपुरीची चववाला खाकरा. टेस्टी असणार.
एकदा खाउन बघितलाच पाहिजे आता! खाकरा मला आवडतोच पण पाणीपुरीवाला म्हणुन जास्त उत्सुकता!!!
खाकरा.टेस्टी असेल अशीच आपण माहिती तर निदान देत जा,
very very testy testy !!!!!I like Khakara so Much....Methichya bhajicha Khakara mala khup awadto ani tao ruchkar ani healthy asto..te tume chaha sobat pan khau shakta...
सचोटीने व्यवसाय केला तर यश मिळते हे वाक्य बालपणीच पांढरपेशा मराठी मुलांच्या मनी शाळेत बिंबवले पाहिजे.
पाणीपुरी खाकरा हा धमाल प्रकार आहे
लेख चविष्ट आहे.
टिप्पणी पोस्ट करा