भूर भूर पाऊस

12 प्रतिक्रिया
भूर भूर पाऊस

मी अंगणात

पाऊस माझ्या मनात

घरात जायची इच्छाच होत नाही

पावसाच्या हळव्या स्पर्शात

स्वत:च हरवून जावं

हळू हळू भिजत राहावं

पाऊस पडत राहावा

आठवणी तशाच

भूर भूर मनाच्या अंगणात

मिटल्या पापण्यांनी

उष्णं श्वासांनी

धुंद शहारत

मीही भिजावं मनातल्या मनात

भूर भूर पाऊस

मी अंगणात

पाऊस माझ्या मनात


कवि: तुषार जोशी,नागपूर
http://tusharnagpur.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 12 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:५९:०० AM

तुषारजी, नेहमीसारखीच कविता अप्रतिम..

१७ जून, २०१०, १२:१९:०० PM

सोडावाला बर्फ घासल्यावर जसा चुरा पडतो तसा भूरभूर पाऊस पडतोय आणि आपण त्यात थेंब थेंब भिजत जातोय असं वाटलं. छान आहे कविता.

१७ जून, २०१०, १२:२६:०० PM

पाऊस रिमझिम असो, मुसळधार असो किंवा भूर भूर असो, त्याचं आणि आठवणी यांच नातं अविभाज्य आहेच. मस्त कविता.

१७ जून, २०१०, १२:४०:०० PM

मस्त.आवडली कविता

१७ जून, २०१०, ६:५८:०० PM

मस्त!

१७ जून, २०१०, ८:३३:०० PM

भुरभुर पावसाची मजा कांहीं औरच. मुंबईच्या मुसळधार पावसापेक्षां वेगळी आणि पुण्याच्या रिमझिम पावसांपेक्षां वेगळी आणि अनोखी. पण त्यासाठीं वाईसारख्या ठिकाणीं जावें लागतें. आकाशांतून शुभ्र मैदा भुरभुरावा तसा भुरभुरतो, गालांना गुदगुल्या करतो, खांद्यांवर इवल्या इवल्या हिर्‍यांची बरसात करतो आणि पाहतां पाहतां पाऊस थांबल्यावर मन आनंदानें भिजतें पण खांदे कधीं कोरडे होतात कळतहि नाहीं.

वेगळ्या पावसाचे वेगळे क्षण मस्त टिपले आहेत.

आठवणी मस्त जाग्या केल्यात. धन्यवाद.

१७ जून, २०१०, ८:४२:०० PM

कविता वाचताना भूरभूर पावसात भिजते आहे असे वाटत होते. :-) छान

१७ जून, २०१०, १०:०७:०० PM

सुंदर... :)

अनामित
१८ जून, २०१०, १:१२:०० AM

छान... भुरभुर पाउस तर आवडतोच पण त्याबरोबरच हि कविताही आवडली.

१८ जून, २०१०, ५:५३:०० AM

पावसात न्हालो कविता वाचल्यानंतर......

२१ जून, २०१०, ३:५७:०० PM

मस्त आहे कविता!!!

२५ जून, २०१०, १२:३२:०० AM

छान! आवडली!