सलाड ओलवीये (इराणी नाव) म्हणजेच चीकन सलाड

12 प्रतिक्रिया
मू ळच्या इराणी पण आता अस्सल भारतीय असलेल्या नीता रानडे आपणासाठी सादर करत आहेत एक इराणी पदार्थ.


 साहित्य:
उकडलेल्या बोनलेस चिकनचे बारीक तुकडे - २५० ग्रॅम 


 
उकडलेले बटाटे - २५० ग्रॅम


  उकडलेले वाटाणे - १ वाटी
उकडलेले गाजर - १ नग


 


लिंबाचा रस - १ लिंबू चवी नुसार
किंवा काकडी + वीनेगर + मीठ लोणचे चवी नुसारमीठ / मीरपूड - चवी नुसार मायॉनेझ - २ मोठे चमचे चवी नुसार
बारीक केलेला कांदा - १ नग चवी नुसार

 

कृती - वरील सगळे जीन्नस एकत्र एकजीव करा. शीत कपाटात थंड करा. 
नुसतेच सलाड किंवा पावाच्या दोन चकत्यामधे घालून खायला तयार.
 

टीप: हाच प्रकार शाकाहारी तयार करण्याकरिता चिकनच्या ऐवजी अळंबी(मश्रूम) किंवा पनीरचा वापर करता येईल. http://golikitch.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 12 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:२८:०० PM

मला हा पदार्थ खूप म्हणजे खूपच आवडलाय. लवकरच करून पहाणार. साहित्य एकदम सहज उपलब्ध होणारं आहे. करून ठेवलं की आयत्या वेळी चटकन खायला घेता येणारे पदार्थ मला आवडतात.

१७ जून, २०१०, १:०५:०० PM

ह्म्ह्म्म्म्म्म्म्म्म, मासांहारी नसल्याने शाकाहारी प्रकार करून पहायला हवा.

१७ जून, २०१०, ६:२१:०० PM

मस्त, नक्की ट्राइ करणार वेज नॉनवेज दोन्ही :)

१७ जून, २०१०, ६:५३:०० PM

मी पण शाकाहारी करून पहाणार नक्कीच!

१७ जून, २०१०, ६:५३:०० PM

मी पण शाकाहारी करून पहाणार नक्कीच!

१७ जून, २०१०, ८:४१:०० PM

दोन दिवसात नीता तीचा < माझी आवड > हा ब्लॉग सुरु करणार आहे. त्यात तीला आलेला पाककृतीच्या बदलाचा अनुभव व त्यामूळे तयार झालेल्या पाककृती त्यात तुम्हाला मिळणार आहेत. जरूर भेट द्या.

१७ जून, २०१०, ८:५१:०० PM

मी पूर्ण शाकाहारी असल्याने कल्पना करतेआहे टोफू किंवा पनीर घालून हीच पाककृती कशी होईल ते. चित्रं छान आहेत.

१७ जून, २०१०, ८:५५:०० PM

शाकाहारी व्हर्शन जास्त आवडेल. अळंबीला शाक म्हटलें तरी स्वाद मात्र मांससदृशच असतो. हल्लींच एके ठिकाणीं जेवायला गेलों असतां मी शाकाहारी म्हणून गुपचूप विनातक्रार अळंबी खावी लागली होती.

सुधीर कांदळकर

१८ जून, २०१०, ३:१९:०० AM

शाकाहारी पाककृती करावी म्हणतो..

१८ जून, २०१०, ४:०७:०० AM

प्रतिसाद देणारे बहुतांशी शकाहारी दिसताहेत. मग ठिक आहे.
चला तयार करा पाहू एकेक जण हा पदार्थ. आणि पाठवून द्या इकडे. मी टेस्ट करून सांगते जमला आहे की नाही.

२१ जून, २०१०, ४:१७:०० PM

आम्ही शुशा आहोत...त्यामुळे शाकाहारीच ट्राय करणार....

७ ऑक्टो, २०१०, ९:२०:०० PM

नीता रानडे धन्यवाद ! माझी एक पारसी मैत्रिण होती कश्मिरा वाडिया तिच्या घरी अगदी हमखास खायला मिळणारी हि पाकृ ..तुम्ही पारसी आहात का ? तिला हि पाककृती कशी केली विचारले की एकच सांगायची "जवादे नी, तने जेटली गमे एटली खायले, पन मने रेसीपी नहीं पुंछ... एम के मने पण नथ खबर :-( "

आता ती अमेरिकेत असते, कधी तिचा मेल आला की सांगतेच तिला "मने श्रेडेडे चिकन sandwich नी मळी गई रेसिपी :-)