संपादकीय

24 प्रतिक्रिया
नमस्कार मंडळी. शब्दगाऽऽरवा आणि हास्यगाऽऽरवा  नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत.....
 पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा !

आम्ही ह्याला ’पावसाळी विशेषांक का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच...तसंच ह्यात सगळं पावसाळ्यासंबंधीचंच वाचायला मिळेल अशीही अपेक्षा असेल...थोडेफार ते बरोबरही आहे. त्या अनुषंगाने काही लेखन पावसाशी संबंधित असेलच, पण आम्ही खरं तर ह्या अंकासाठी विषयाचं असं बंधन ठेवलेलं नसल्यामुळे इतरही विषयांवरचे लेखन आपण इथे वाचू शकाल.. आता तुम्ही म्हणाल की मग पावसाळी विशेषांक  असं आम्ही का म्हणतोय?
तर, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे....पावसाळ्यात काढतोय म्हणून पावसाळी विशेषांक.  :)

ह्या अंकात आपल्याला विविध साहित्य प्रकार वाचायला मिळणार आहेत...ललित लेखन,कथा,कविता,पाककृती,प्रवासवर्णन इत्यादि. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे. त्यांची नावे? अहो सांगतो ना.....
कांचन कराई, सुधीर कांदळकर, महेंद्र कुलकर्णी, क्रांति साडेकर, श्रेया रत्नपारखी, प्राजु(प्राजक्ता पटवर्धन), जयंत कुलकर्णी, जयबालाताई परूळेकर, नरेंद्र प्रभू, नरेंद्र गोळे, तुषार जोशी, मनीषा भिडे, विनायक रानडे, नीता रानडे, हेरंब ओक, विद्याधर भिसे, मदनबाण, मीनल गद्रे, अपर्णा लळिंगकर, देवेंद्र चुरी, जीवनिका कोष्टी, रेश्मा गाडेकर, ओंकार भारद्वाज, सुहास झेले इत्यादि मंडळी आहेत ह्या अंकात.

आता तुमचे काम इतकेच...अंक वाचायचा आणि आपले अमूल्य मत नोंदवायचे... अंक आवडला म्हणून!
काय म्हणता?  आवडला, तरच मत नोंदवायचे? आणि समजा नाही आवडला तर?
तरीही, हो,हो! अगदी अंक नाही आवडला तरीही जरूर नोंदवा! आपल्या अभिप्रायामुळेच तर आम्हाला कळू शकेल...आम्ही आमच्या प्रयत्नात कितपत सफल झालोय ते.

काय? मग वाचणार ना? मग करा सुरुवात!

विशेष उल्लेखनीय बाब: ह्या अंकाची तांत्रिक मांडणी (टेम्प्लेट इत्यादि) श्रेया रत्नपारखी हिने केलेय. पावसाळी अंकाला अनुकूल अशी बहारदार मांडणी आणि सजावट केल्याबद्दल तिचे खास अभिनंदन!!!

आपल्या ह्या अंकाचे जे छानसे मानचिन्ह उजवीकडे दिसत आहे ते कांचन कराई हिने अतिशय थोड्या वेळात करून दिलंय...त्याबद्दल तिचेही खास अभिनंदन.


कळावे
आपला स्नेहांकित
प्रमोद देव
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 24 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:१६:०० AM

जे जे बघीतले ते फारच छान आहे. अंक तयार कारण्यातली मेहनत ठळकपणे दिसून येत आहे. लगे रहो प्रमोदजी !

१७ जून, २०१०, १२:३९:०० AM

देव साहेब एका सुंदर पावसाळी विशेषांका बद्दल आपले अभिनंदन! सुंदर व आकर्षक मांडणी बद्दल श्रेया रत्नपारखी यांचे अभिनंदन व अप्रतिम आणि अंकाला साजेसे विजेट तयार केल्याबद्दल कांचन कराई यांचे अभिनंदन!

१७ जून, २०१०, १२:४३:०० AM

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !! काका, खुपच छान झालाय अंक. !

१७ जून, २०१०, १२:५४:०० AM

देवा लैई बेस, झ्याक, अफलातून, क्रियेटिव ऋतू हिरवा..
तुमचे आणि श्रेयाताईचे खूप खूप अभिनंदन..!!

१७ जून, २०१०, १:१०:०० AM

देका तुमचे आणि श्रेया ताईचे अभिनंदन !!!
अंक सुरेख आहे. :)

१७ जून, २०१०, ७:०३:०० AM

काका, हिरवागार वर्षा अंक मस्त सजलाय.

श्रेया ताई आणि तुमच हार्दिक अभिनंदन.

१७ जून, २०१०, १०:१०:०० AM

मंडळी, तुमचं अभिनंदन स्वीकारले. केलेल्या मेहनतीबद्दल एक लेख मी माझ्या जालनिशीवर टाकीनच. खरं तर खूप काही करायचं मनात होतं...पण तांत्रिक ज्ञान नसल्याने; मनात आलेले सगळे काही करणे शक्य झाले नाही. तरिही हा अंक तुम्ही गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद.

१७ जून, २०१०, ११:०२:०० AM

देवकाका, श्रेया ताई आणि कांचन यांचे मन:पूर्वक अभिनंदन...इतका सुंदर विशेषांक दिल्या बध्दल!

सुरूवातीला अगदीच कमी लेख आणि कविता होत्या. शेवटच्या ४-५ दिवसांत लेख आणि कथा-कवितंचा पाऊसच पडला. अंकाचं पावसाळी विशेषांक हे नाव सार्थ झालंय.

१७ जून, २०१०, ११:११:०० AM

मांडणीं आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण. प्रथमदृष्टिक्षेपांत साहित्यहि दर्जेदार असल्याचें दिसतें आहे. आपले अंक चढत्या भाजणीनें दर्जेदार होत आहेत आणि इतर अंकापेक्षां वेगळेपणहि नजरेंत भरण्याजोगें आहे. अभिनंदन धन्यवाद आणि शुभेच्छा.

सुधीर कांदळकर.

१७ जून, २०१०, ११:५०:०० AM

देवकाका, श्रेया ताई आणि कांचन यांचे मन:पूर्वक अभिनंदन...हिरवागार वर्षा अंक मस्त सजलाय... !

१७ जून, २०१०, १२:२६:०० PM

रानडेसाहेब,कोष्टीसाहेब,हेरंब,सुहास,मदनबाण, आनंद,अपर्णा,कांदळकरसाहेब आणि राज जैन...आपणा सर्वांना अंक आवडला...भरून पावलो.
मात्र ह्यात माझा फक्त ५% वाटा आहे...बाकी श्रेया,कांचन आणि समस्त लेखकू मंडळींमुळे हे शक्य होऊ शकले.
सर्व प्रतिसाददात्यांना धन्यवाद आणि सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

१७ जून, २०१०, १२:४३:०० PM

काका, खूप खूप अभिनंदन!!! खूप छान आहे अंक.

१७ जून, २०१०, १:५५:०० PM

काका, अंक एकदम ब्येष्ट झाला आहे. तुम्ही या अंकामधे मोठी बाजी मारली आहे. पावसाळी अंकावर पावसाप्रमाणेच साहित्याची बरसात झाली आहे. तशीच वाचकांची व प्रतिक्रियेचीही होवो, ही देवी सरस्वतीचरणी प्रार्थना. माझ्या शुभेच्छा तर आहेतच नेहमी.

१७ जून, २०१०, २:०४:०० PM

अभिनंदन काका!
छानच झालाय अंक.
पुढील सर्व अंकांसाठीही शुभेच्छा.

१७ जून, २०१०, १०:२९:०० PM

श्री. देव, श्रेया व कांचन (एकवचनी उल्लेखाबद्दल क्षमस्व)
सुंदर अंक बनवल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. सर्व लेखकांचेहि अभिनंदन.
देवा, आपला मराठी लिहिण्या-बोलण्याबद्दल कटाक्ष असतो तर मग ’टिप्पणी ’पोस्ट’ करा’ कां बरें?
लेखकांनी लिहिताना शुद्धलेखनाकडे थोडे जास्त लक्ष दिले तर बरे होईल. देवानी या संदर्भात फारशी मास्तरकी केलेली नसावी असे वाटते. (कीं ही जबाबदारी घ्यायची नाही असेच ठरलेले होते?). आपल्या भाषेचे सौंदर्य आपणच जपावयास हवे.

१७ जून, २०१०, १०:५४:०० PM

जीवनिका,कांचन,मीनल आणि फडणीसाहेब धन्यवाद.
फडणीससाहेब....मराठी लिहिण्या-बोलण्याचा माझा नक्कीच कटाक्ष असतो...आणि जिथे शक्य झाले तिथे मी थोडीफार मास्तरकी केली....पण काही ठिकाणी मात्र मी अक्षरश: हात टेकलेत हे खरंय. :)
पुढच्या अंकाच्या वेळी नक्कीच काहीतरी तोडगा ह्यावर काढू असे आश्वासन देतो.

अनामित
१८ जून, २०१०, १:१५:०० AM

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!
एकदम झक्कास झाला आहे हा विशेषांक...

१८ जून, २०१०, ११:०३:०० AM

अजून अंक वाचलेला नाही. उद्या सावकाश वाचीन घरी बसुन मसाला चहाचे घोट घेत. :)

१८ जून, २०१०, १२:१६:०० PM

फडणीस काका, तुम्ही दाखवून दिलेली चूक रास्तच आहे. अंक पाहून नुसतीच स्तुतीसुमने न उधळता, कानपिचक्या दिल्यात त्यामुळे अंक सुधारण्याच्या दॄष्टीने मदतच होईल. तंत्र प्रमुख मी असल्याने देव काकांचा मात्र या चुकीशी काहीही संबंध नाही.
वाचल्यावर; ती तात्काळ दुरूस्त करायचा मी माझ्याकडून प्रयत्न केला. आधी वाटलं की टेम्पलेट चा दोष असावा, पण टेम्पलेट च्या माध्यमातून ती दुरूस्त करता येत नाहीये याचा अर्थ कदाचित हे वाक्य ’ब्लॉगर’ ने असाच अनुवाद करून वापरायचे ठरवले असावे. याला मात्र आपला काही इलाज नाही. मी स्वत: ब्लॉगर वर वावरत नसून वर्डप्रेस वर वावरते, तरिही येनकेन प्रकारेण हा बदल शक्य झाल्यास अवश्य करण्यात येईल. ज्यांना कोणाला याबाबत अधिक माहिती असेल त्यांनी मला majhiduniya@gmail.com वर संपर्क करावा.

अनामित
१८ जून, २०१०, १२:५४:०० PM

वाह! अंक सुंदर झाला आहे. सर्व टीमचे व अंकात सहभागी मंडळींचे अभिनंदन.

भरपूर वाचायला आहे. वाचत आहे.

सहज

१९ जून, २०१०, ९:२७:०० AM

देवकाका, अंक अगदी दर्जेदार दिवाळी अंकांसारखा मस्त सजलाय. वाचायलाही भरपूर काही उत्तम आहे, आरासही अगदी झकास झाली आहे, अगदी मन लावून चवीचवीनं वाचावा, पहावा असा जमला आहे बेत. [दिवाळी अंकासाठी आतापासूनच शुभेच्छा!]

२२ जून, २०१०, ४:०८:०० AM

अंक छानच आहे. पण सारे लेख उघडत नाहीत. कविता नाही दिसल्या .

२२ जून, २०१०, ७:३५:०० AM

जीवनिका, क्रान्ति आणि आशाताई...आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

आशाताई आपल्याला कविता का बरं नाही दिसल्या?
जर कवितेचा दुवा उघडत नसेल तरीही आपण कविता वाचू शकता..त्यासाठी वैयक्तिक लेखकांच्या नावावर टिचकी मारलीत तरी कविता वाचता येतील.
ह्या अंकातले कवि/कवयित्री आहेत....हेरंब ओक,ओंकार भारद्वाज,नरेंद्र प्रभू,तुषार जोशी,देवेंद्र चुरी,क्रान्ति साडेकर,मनीषा भिडे,प्राजु,जीवनिका कोष्टी आणि रेश्मा गाडेकर.

२४ जून, २०१०, ११:४५:०० PM

वर्षा अंक खुपच छान झाला आहे. मांडणी अप्रतिम! अजुन वाचायला मिळाला नव्हता. आता वाचुन काढतॊ. पुढील अंकासाठी आतापासुनच शुभेच्छा!