दमलोय मी, भेदरलोय मी
भीती वाटते मला
भीती वाटते मला
देवबाप्पासारखा शांत बसलो नाही तर
पळवून घेऊन जाणार्या बुवाची
अंधारात दडलेल्या भुतांची
शाप देण्यासाठी टपून बसलेल्या
रस्त्यावरील प्रत्येक लिंबाची
पिंपळावरील वेताळाची
किमान दहा लोकांना फॉरवर्ड करा
अशी धमकी देणार्या इ-मेल्सची
त्यातल्या देवाची आणि त्याच्या शिक्षेची
स्पेलिंग नाही बदललं तर
अशुभ ठरणार्या माझ्याच नावाची
तेरा आकड्याची
माझ्या समोरचा माणूस माझ्याबद्दल
काय विचार करतोय याची
समाजाला काय वाटेल त्याची
प्रश्नचिन्हाची, उत्तरांची
ज्ञानाची
अज्ञानाला कवटाळतो मी
त्यातून निर्माण होणारा देव कसा
सगळ्याची जबाबदारी घेतो
आणि मला तर भीती आहे
साध्यासुध्या जबाबदारीची
जगण्याचीही, मरण्याचीही
आरशातील माझ्याच प्रतिमेची
सत्याची
दमलोय मी, भेदरलोय मी
भीती वाटते मला
ही भीती खाऊन टाकतेय मला
मला उडायचंय
भीतीपासून मुक्त व्हायचंय
मला जगायचंय!
कवि: ओंकार भारद्वाज
यावरच्या 14 प्रतिक्रिया
ओंकार, एकदम सही रे..मस्त जमलीय
एकदम भन्नाट कवित ओंकार. भिती घालवण्यासाठी सगळ्यांना फॉरवर्ड करावी अशी.
एकदम जबरी आहे कविता.
झकास.
भिती वाटतेय मला
प्रतिक्रिया न देण्याची
मस्त!
छानच!
@ कांचनताई - खरंच लहानपणापासून एवढ्या गोष्टींचा धसका मनात बसलेला असतो किंवा मनात भरवून दिलेला असतो ना! काही गोष्टींबद्दल साहजिकच भीती वाटणार, सजीव असल्याचं लक्षण आणि तगून राहण्यासाठी एक आवश्यक गुण आहे तो.
पण आपण माणसं अनेकदा अनावश्यक गोष्टींचा एवढा बाऊ करतो की ते बघून वैताग येतो. तीच या कवितेमागची प्रेरणा आहे म्हटलं तर.
आणि बाकी सगळ्यांनाही धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. कोणाला आवडली नसेल तर तेही सांगावं. (आणि अर्थात आवडली तर जरून सांगा :) )
- ओंकार
हाहा भिऊनच प्रतिक्रिया देतोय..
कविता आवडली...
मस्तच जमली आहे...भीत भीतच वाचली पण आवडली... :)
सही कविता.. !!
खूपच छान!
किमान दहा लोकांना फॉरवर्ड करा
अशी धमकी देणार्या इ-मेल्सची..
याबद्द्ल माझ्या एका मित्राने ओरडले होते, तेव्हा आता त्याला माझ्या रागावण्याची भिती असणार नक्की!
जबरा! मस्त्!
Jonathan Livingston Seagull! :-).
टिप्पणी पोस्ट करा