किती दिवस त्याच
जुन्या गोष्टी घेऊन बसायचं
आपणच आपलं जगणं
नव्याने सुरु करायचं
जुन्या मळक्या भिंतीना
नव्याने रंग द्यायचा
वेड्या वाकड्या धुंद गाण्यात
सूर गवसला म्हणायचा
फुलपाखराच्या नाजूक पंखात
रंग नवा शोधायचा
मोगर्याचा धुंद सुगंध
जीवनी उतरवायचा
कवयित्री: जीवनिका कोष्टी
http://jivanika.wordpress.com/
http://jivanika.wordpress.com/
यावरच्या 13 प्रतिक्रिया
अतिशय सुंदर कविता आहे ही. पहिल्या कविते बद्दल अभिनंदन!
अरे वा ! पहिलीच कविता का ! छान आहे.
पहिलीच कविता एवढी मस्त आहे तर नंतरच्या कशा असतील!
छोटीशीच पण अभिप्रेत अर्थ जसाच्या तसा वाचकापर्यंत पोचतो.
पुढच्या कवितेकडून अपेक्षा वाढल्या आहेत :)
- ओंकार
आवडली कविता...
अगदीं खरें भसाड्या स्वरांत भरपूर गावें, फुलपाल्हरांचे नवे रंग शोधावेत आणि मोगर्याचा नित्य नवा गंध अनुभवावा.
झकास.
सुरेख कविता.
प्रत्यक्ष अंमल करतोच.. कवितेचा भावार्थ बरंच काही सांगून जातो..
पहिल्या कविते बद्धल अभिनंदन, छान आहे. :)
chan kavita aahe
जिवनिका,पहिलीच कविता असुनसुदधा विचारपुर्वक आणि छान लिहली आहेस..अशीच लिहित रहा...
सर्वांचे खूप खूप आभार. खरे म्हणजे मला वाटले नव्हते हि कविता इथे प्रकाशित होईल असे. छोटीशी कविता आहे आणि थोडी अपूर्ण वाटते. पण देवकाकांचे खूप आभार कि त्यांनी या कवितेला इथे स्थान दिले.
खूप छान कविता आहे. छोटीशी पण अर्थपूर्ण..
आवडली कविता!
टिप्पणी पोस्ट करा