तूच... !!

22 प्रतिक्रिया
पाऊस पडायचाय अजून पण

भरकटणार्‍या वार्‍याने फरपटणारी पानं

क्षण दोन क्षणापुरतं आकाश चंदेरी करणार्‍या वीजा

झाडांची सळसळ आणि ढगांचा कल्लोळ

पाऊस येणार हे मनोमन पटत असतं...


पण अचानक बघता बघता

सगळं गायब होऊन जातं.

वारा थंडावतो, वीजा मालवतात..

पावसाच्या वाकोल्या लांबूनच दिसतात..


आणि मग अचानक कधीतरी ध्यानीमनीही नसताना

रोरावत, रौद्रावत, घोंघावत, येतोस अचानक...

बेसावध क्षणी गाठावं तसा..

कपड्यांची शुद्ध नसते की रूपाचं भान..

अवचित मागून येऊन विळखा घालावास तसा.


कधी कधी मात्र कशाचाच मागमूस नसतो.

ना कसली चाहूल ना कसल्या पाउलखुणा

हलकेच येतोस अंदाज घेतोस

अचानक समोर उभा राहून हनुवटीखाली बोट ठेवून

माझा झुकला चेहरा वर करावास तसा.


पण आताशा आताशा...

मागमूसच नसतो तुझा...

दिसत नाहीस की भेटत नाहीस

चाहुली नाही की खाणाखुणा नाहीत

धिंगाणा नाही की हळुवारपणाही नाही.

पुन्हा पुन्हा त्या लांबून दिसणार्‍या वाकोल्या फक्त.


हल्ली वेड्यासारखा वागतोस.

पाऊसही आणि तूही...

लवकर ये.. येशील??

सांग ना.... !!


कवि: हेरंब ओक
http://www.harkatnay.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 22 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:४५:०० AM

अप्रतिम! हेरंब सुंदर झाली आहे ही कविता!

१७ जून, २०१०, १:०४:०० AM

कसली सुंदर झाली कविता आहे
खूपच सुंदर.मला आवडलेली पावसावरील सर्वोकृष्ट कविता. हॅट्स ऑफ

१७ जून, २०१०, १:३२:०० AM

तुला बोललो होतो ना जेव्हा वाचेन तेव्हा मनापासून प्रतिक्रिया देईन..
कविता अगदी सुरेख, अप्रतिम, बेष्ट झालीय (जसा मी तुला आधीच सांगितला होती तशीच...:-))

१७ जून, २०१०, १०:३२:०० AM

हेओ, अगदी अप्रतिम जमून आलीये कविता.

अगदी आतून.

१७ जून, २०१०, १:३६:०० PM

हेरंब, मस्त आहे रे कविता. तू कवितासुद्धा करतोस, हे माहित नव्हतं. एकदम आश्चर्याचा धक्का बसला. एकदम हळूवार विषय छेडलास.

१७ जून, २०१०, ४:५८:०० PM

मस्त हेरंब... पावसाचे अनेकविध मूड मस्त पकडले आहेस...

१७ जून, २०१०, ९:५०:०० PM

अप्रतिम आणि सुंदर...प्रेमाचा एक वेगळाच अनुभव मला कवितेत दिसला...

अनामित
१७ जून, २०१०, १०:१८:०० PM

छान आहे कविता. खूप छान पद्धतीने मांडल्या आहेत भावना.

१७ जून, २०१०, १०:३४:०० PM

लय भारी !!! :)

अनामित
१८ जून, २०१०, १२:५६:०० AM

एकदम झक्कास राव.. फ़्युचरात हा प्रांतसुदधा तु गाजवणार अस दिसते आहे...

१८ जून, २०१०, १०:१२:०० AM

कोष्टीकाका, खूप आभार.

सागर, :) सर्वोकृष्ट कसली रे.. लाजवतोयस.. धन्स..

सुहास, हो आठवतंय.. चला म्हणजे तुला खरंच आवडली तर :)

सपा, खूप आभार. असाच एक प्रयत्न.

कांचन, खूप आभार.. अग कधीतरी करतो. खूप काही भिडलं तरच. बाकी हुकुमी कविता जमणं हे माझ्यासाठी अशक्य आहे. पाऊस हा विषयच हळुवार आहे एकदम. त्याच्यामुळेच कविताही हळुवार झाली एकदम :)

आभार आनंद.. पावसाचे आणि प्रेमाचेही..

भारत, अगदी बरोबर. थोडाफार तसाच प्रयत्न होता..

आभार जीवनिका.. असाच प्रयत्न केला.

बुवा, आभार्स.

देव, धन्स.. बापरे प्रांत गाजवणं वगैरे कायच्या काय लांब आहे. :) आणि तशाही कविता मला विशेष सुचत नाहीत. अशाच कधीतरी..

१८ जून, २०१०, १:५२:०० PM

आवडली.

सुधीर कांदळकर

१९ जून, २०१०, ३:५०:०० PM

:)
Khoop chaan...!!!

२२ जून, २०१०, २:१६:०० PM

छान रे..
तू कविताही करतोस..
असेच लिहित रहा

२२ जून, २०१०, २:१६:०० PM
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
२५ जून, २०१०, १२:१५:०० AM

सुधीरजी, मैथिली, मीनल, आभार्स !!

२५ जून, २०१०, १:१२:०० AM

तु कवितापण करतो आणि ती पण 'अप्रतिम' हे कळले. छान आहे कविता.

२५ जून, २०१०, १:३८:०० AM

आभार सीताराम. हो करतो कधीकधी.. अधूनमधून :)

२६ जून, २०१०, ७:५१:०० AM

mast ahe kavita
keep it up!

२९ जून, २०१०, ६:०२:०० AM

आभार योग.

५ जुलै, २०१०, ४:३१:०० PM

सुंदर कविता आहे ,चांगली वाटली ,छ्यान आहे

१७ जुलै, २०१०, ४:१४:०० AM

आभार काका.