इंद्रधनू..

7 प्रतिक्रिया
हिरव्या नवथर अंगावरती

फेर धरूनी उठे शहारा

बिंदू नाजूक अवखळ ओला

भासे मज लखलखता पारा



फुंकर इवली हळूच कानी

शीळ घालूनी घुमतो वारा

उतरूनी येतो अलगद खाली

रवी किरणांचा धुंद पसारा



मेघ लाजूनी समीप येती

हृदयी त्यांच्या घुमे नगारा

काळीज होते पाणी पाणी

                                                                        आणिक कोसळती जलधारा



सरसावली मग रवीकिरणेही

करून हलका एक इशारा

लख्ख न्हाऊनी उन्हात ओल्या

रंग धरेचा सोनसाजरा



कमान ऐसी उभी राहिली

रंग फासूनी आज भरारा

इंद्रधनू ते मिरवीत होते

सतरंगांचा भलता तोरा



कवयित्री: प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 7 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:३०:०० PM

सुंदर कविता. प्रत्येक कड्व्यात क्रमाक्रमाने एक गोड कथा सांगितली आहेस.

१७ जून, २०१०, ८:५७:०० PM

शब्दकळेचा लयबद्ध, नादमधुर तोरा हवाहवासा वाटणारा आहे.

सुधीर कांदळकर

१७ जून, २०१०, ९:४१:०० PM

पावसाळी अंक सर्वाथाने हिरवा केला प्राजुताय..

१७ जून, २०१०, १०:११:०० PM

कविता आवडली हे सांगायला हवे काय ? ;)

१७ जून, २०१०, १०:४३:०० PM

नेहमीप्रमाणेच नादमधुर आणि चित्रदर्शी कविता.

२२ जून, २०१०, २:२५:०० PM

खूप गोड आहे कविता.

काळीज होते पाणी पाणी
आणिक कोसळती जलधारा.. :)

प्रवासी
२१ ऑक्टो, २०१०, ५:५७:०० PM

प्राजुताई,

आपली कविता खूप आवडली.

आपला
(वाचक) प्रवासी