रानात दरवळे गंध
मातीचा ओला धुंद
उमलती कळ्या कळ्या
तो भ्रमर होई बेधुंद ।
पानोपानी थेंब टपोरे
चमकती रेशमी किरणे
फांदीवरी हलके हलके
विसावती ओले पंख ।
तृणांकुरी नाजूक हिरव्या
पसरती रंग पिसारे
मनास मोही गेंद फुलांचे
विखूरती मधुगंध ।
मयुराची साद येई
अंग-रंग उमलुनी
सुरेल गाती पक्षी
नदीतील उसळे पाणी।
गगनी इंद्रधनूच्या
सप्तरंगांच्या कमानी
तृप्त ओली धरणी
आभाळी उमटे लाली ।
कवयित्री: मनीषा
http://mogara-phulala.blogspot.com/
http://mogara-phulala.blogspot.com/
यावरच्या 6 प्रतिक्रिया
कविता छान आहे. विशेषत: पहिली तीन कडवी जास्त आवडली.
सुंदर.
सुधीर कांदळकर
मस्त...
छानच आहे कविता.
श्रावण डोळ्यासमोर उभा राहतो कविता वाचुन...छानच...
निसर्ग वर्णन खूप छान टिपलं आहे...
टिप्पणी पोस्ट करा