सर आली !

5 प्रतिक्रिया
रसर ही सर आली गं ।

तृषार्त धरणी न्हाली गं ॥धृ॥


आला सोसाट्याचा वारा  ।

खग़ सावरती घरा  ।

कडाडते वीज वरती गं  ।

निवार्‍यास मी आले गं ॥१॥


झाल्या चिंब रानवाटा  ।

ओथंबल्या तरूलता  ।

मृदगंधीत होती वारे गं  ।

पालटले रुप सारे गं ॥२॥


बैल जोडी उभी लांब  ।

आता नको म्हणू थांब  ।

माती लोणी झाली गं  ।

बिजा जाग आली गं ॥३॥


किती जोराचा पाऊस  ।

उतार नाही कोसों कोस  ।

उरले दूर घर माझे गं  ।

रडत तान्हुला असेल गं ॥४॥


पिक तरारून आले  ।

वार्‍यासंगे हाले डोले  ।

सुखात हे मन न्हाले गं  ।

दंवात हळवे झाले गं ॥५॥
कवि: नरेंद्र प्रभू
http://prabhunarendra.blogspot.com/
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, इतरांनाही पाठवा!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

यावरच्या 5 प्रतिक्रिया

१७ जून, २०१०, १२:५१:०० म.उ.

मस्त काका, कविता वाचून माझ मन गावी शेतातून फिरून आल.

१७ जून, २०१०, ८:५०:०० म.उ.

छान. लयबद्धता मस्त जमली आहे. शब्दांना पण एक मस्त नाद आहे. तान्हुल्यापाशीं मात्र मन थबकलें.

सुधीर कांदळकर

१७ जून, २०१०, १०:०५:०० म.उ.

छान कविता... :)

१७ जून, २०१०, १०:३९:०० म.उ.

कविता आवडली.

१८ जून, २०१०, ३:२३:०० म.पू.

शेताच्या बांधावरची आठवण करून दिलीत..