मनी हसले गाव माझे अन् ,
क्षणात फुलले मन माझे..........
शब्दाविण सजले अन्
वार्यातही झुलले, मन माझे..........
क्षण अनेक येती अन्
अनेक येती पावसाळे
सूराविण रमले अन्
तालावर धुंदले, मन माझे................
चांदण्याच्या अवकाशी
शीतल जलाकाठी
तुझ्याच सवे नि:शब्द
रमले मन माझे..........................
अश्रूतही हसले
वादळातही स्तब्धले
तुझ्या आठवणींच्या
सरीत भिजले, मन माझे.......................
तुझ्या विरहातही
सूरात गायले परि
तुझ्याविण एकटेच
भासले मन माझे...
कवयित्री: रेश्मा गाडेकर
http://www.shabdatunmazya.blogspot.com/
http://www.shabdatunmazya.blogspot.com/
यावरच्या 8 प्रतिक्रिया
मस्त जमलीये कविता.
आठवणींच्या हिंदोळ्याची कविता. आवडली.
कविता आवडली...
मस्तच झाली आहे कविता...
मन माझे चपळ, न राहे निश्चळ हे किती खर आहे हे कविता वाचून प्रतीत होतंय.. खूपच छान रेश्मा
आवडली.
सुधीर कांदळकर
छान ।
KHUP CHAN AHES KHARACH........ I LOVE THIS PAGE
टिप्पणी पोस्ट करा