हल्ली , विशेष करून उन्हाळ्यात बर्याचदा दूध तापवतांनाच अचानक फाटतं....मग अशा वेळी काय करायचं? दूध फेकून द्यायचं? नाही, नाही. जरा थांबा.
अहो त्या नासलेल्या दूधाच्या मस्तपैकी वड्या बनवता येतात. कशा? तर आता वाचा आणि स्वत:च बनवून पाहा.
साहित्य: १) पनीर- १ वाटी
२) ३ वाट्या ओले खोबरे
३) १ वाटी साईसकट दूध
४) ३ वाट्या साखर
५) २-३ चमचे पिठी साखर
६) वेलची पूड १ छोटा चमचा
७) २ चमचे तूप
कृती: आधी पनीर आणि खोबरे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर जाड कढईत किंवा पॅनमध्ये पनीर-खोबरे मिश्रण, साखर, दूध सर्व एकाच वेळी घालून ढवळत राहावे. हे सगळे मिश्रण कडेकडेने सुकायला लागले की गॅस बंद करून दळलेली साखर किंवा पिठीसाखर घालून २-३ मिनिटे ढवळत राहावे.
एका ट्रे किंवा ताटाला तूप लावून त्यात हे सर्व मिश्रण ओतून ते नीट पसरावे. नंतर सुरीने वड्या कापाव्या.
.
वेगळ्याच चवीच्या ह्या झटपट वड्या खातांना रुचकर लागतात.
जरूर करून पाहा.
*ह्या वड्यांना रंग हवा असल्यास मिश्रण करतांना थोडेसे केशरही वापरता येईल.
*तसेच बदाम-पिस्त्याचे काप करून ते वरती पेरून वड्या अजून सजवता येतील
*नासलेल्या दूधाचे परोठे, उत्तपे, भुर्जी असे इतरही पदार्थ करता येतात. त्यामुळे दूधही फुकट जात नाही.
लेखिका: जयबालाताई परूळेकर
यावरच्या 6 प्रतिक्रिया
वा! छानच दिसतोय हा नवीन पदार्थ. दूध नासलं तर करण्यासाठी आणखी एक पदार्थ मिळाला.
एकच प्रश्न: यात दूध नासलेलंच हवं का?
घरी नेऊन दाखवतो हे.
आणि वाट पाहतो आता कधी दुध नासतेय याची.
जरा दूध फाडायची रीत सांगतां? पहिला प्रयोग तुमच्याच घरीं करतों.
सुधीर कांदळकर
वा माझ्यासारख्या खादाड प्रिय माणसाला उपयुक्त असा पदार्थ..नक्कीच करेन
सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद.
नासलेल्या दुधाचा उत्तम वापर.. चला माझ्या खादाडीला आणखी एक पर्याय..
टिप्पणी पोस्ट करा