तुला पहिल्या वेळी पाहिल्यावर
पुढे असं काही होईल, कधी वाटल नव्हतं
तू मला भेटण्याआधी खरंतर
प्रेम म्हणजे काय कधी कळलंच नव्हतं
गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
मी असा गुंतेन, कधी वाटलं नव्हतं
तुझ्या त्या अथांग नजरेत हरवून
कसा तुझाच होत होतो हे समजतच नव्हतं
तुझा सहवास, तुझा तो स्पर्श
असं वेड लावेल, कधी वाटलं नव्हतं
तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं
व्याकुळ होऊन तुझी वाट पाहतांना
कोणासाठी असा झुरेन, कधी वाटल नव्हतं
आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं
माझ्या जीवनात कोणी अस हळुवार येऊन
माझ जीवनच बनून जाईल, कधी वाटल नव्हतं
अन माझ्या जीवनातील वाळवंटाची अशी बाग होतांना
अचानक मला जाग येईल असंही कधी वाटल नव्हतं.....
कवि: देवेंद्र चुरी
http://davbindu.wordpress.com/
http://davbindu.wordpress.com/
यावरच्या 17 प्रतिक्रिया
वाह..मस्त :)
सही! मनापासून आवडली कविता. शेवट्चं कडवं थोडं दु:खी वाटलं पण अशी कविता कुणा मुलीसमोर म्हटलीस तर खलास! तू एंगेज्ड नसशील तर ट्राय करून पहायला हरकत नाही.
अगदी मनापासून आवडली कविता.
कांचनशी सहमत. महेंद्र कुलकर्णींच्या नुस्क्यांमध्ये ’हि कविता मुलीला ऐकवा’ असा एक नुस्का लिहायला हरकत नाही.
मस्त आहे...
एखादी भेटली कीं हें वाळवंट पण बागेसारखॆं वाटेल बरें.
छान.
सुधीर कांदळकर
कविता फार आवडली...
खासच कविता.
इथे थोरामोठ्यांच्या प्रतिक्रिया पाहुन खरच खुप आनंद झाला....कारण कविता हा माझा प्रांत नसतांना असाच कधीतरी हा दवबिंदु तिथे घुसखोरी करत असतो.त्यामुळे देवकाकांना ही कविता पाठवतांनासुदधा पाठवु कि नको, कोणाला आवडेल कि नाही ही कविता असा विचार मनात आला होता.पण शेवटी पाठवली एकदाची...असो वरील सर्वांना खुप खुप धन्यवाद आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
(कांचनताय आता कोणी भेटली आणि आवडली कि नक्की ऐकवीन तिला हि कविता... :) )
लई भारी.. माझ्या नावावर खपवली तर चालेल ना? म्हणजे आमालाबी आसरा.. :))
खूप छान कविता आहे. हळुवार ..
भारत बिनधास्त खपव रे..पण माझ नाव पण घे बरोबर..जतीन-ललीत,अजय-अतुल,सलिम-जावेद सारख.. :)
हेरंब धन्स रे...
वा, मस्त जमलीय कविता .
खूप छान
आशाजी आणि मीनल ताई,आपण आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मंडळ आभारी आहे...
मस्त्!
mastch..
टिप्पणी पोस्ट करा